आताच शेअर करा

दिनांक: २१/०४/२०२६

बांदा:पाडलोस गाव ग्रुपच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नव्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी लक्ष्मण (बापू) माधव यांची निवड करण्यात आली आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तरुण व उत्साही नेतृत्व पुढे आले आहे. उपाध्यक्षपदी कृष्णा (अजित) गावडे यांची निवड झाली आहे. सचिवपदी गंगाराम (अमेय) गावडे, खजिनदारपदी रोहित गावडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तसेच सहसचिव म्हणून कृष्णा (दादा) सातार्डेकर, सहखजिनदार म्हणून रविंद्र सातार्डेकर यांची निवड करण्यात आली आहे. अंतर्गत नियंत्रक म्हणून प्रणीत गावडे आणि प्रसिद्धी माध्यम प्रमुख म्हणून विश्वनाथ नाईक यांची निवड झाली आहे.
ही कार्यकारिणी गावातील सामाजिक, सांस्कृतिक व विकासात्मक उपक्रमांना गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मण माधव यांनी स्पष्ट केले. युवकांच्या सहभागातून गावात नवे उपक्रम राबवून एकात्मता वाढवण्यावर भर दिला जाणार असे उपाध्यक्ष अजित गावडे यांनी सांगितले.
ग्रामस्थांकडून नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या नेतृत्वाखाली पाडलोस गाव अधिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed