
दिनांक: २०/०४/२०२६
सावंतवाडी: महिला आर्थिक विकास महामंडळ, सिंधुदुर्ग स्थापित माहेर लोकसंचलित साधन केंद्र, सावंतवाडी अंतर्गत सातार्डा (घोगळवाडी) येथील नव तेजस्विनी यशस्वी काजू उत्पादक गटाच्या सुरु असलेल्या नवतेजस्विनी काजू प्रक्रिया प्रकल्पचा सन 2026-27 या आर्थिक वर्षातील या हंगामी प्रथम बॉयलर अग्निप्रदान कार्यक्रमाचा शुभारंभ आज दिनांक 19/04/2026 रोजी अक्षय तृतीया च्या शुभ दिनी शुभारंभ करण्यात आला.. सिंधुरत्न व PMFME (प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना) अंतर्गत मंजूर झालेल्या या प्रकल्पाचा समावेश व्हॅल्यू चेन सब-प्रोजेक्ट मध्ये करण्यात आला होता. या माध्यमातून ग्रामीण महिलांना उद्योग उभारणीसाठी आर्थिक मदत, तांत्रिक मार्गदर्शन व बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजनाने झाली. यानंतर युनिटमध्ये उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीचे पूजन करून हार-अक्षता अर्पण करण्यात आले. त्यानंतर अग्निपूजन करण्यात आली.यावेळी पंचायत समिती सदस्य श्री. उदय पारिपत्ये, सातार्डा गावच्या उपसरपंच श्रीम. विशाखा पारिपत्ये मॅडम, माहेर cmrc च्या अध्यक्षा श्रीम. भक्ती दळवी मॅडम, उपाध्यक्ष श्रीम. मिताली राऊळ व पूजा मेस्त्री मॅडम, जिल्हा समन्वय अधिकारी माविम, सिंधुदुर्ग चे श्री. अंबरिश मिस्त्री सर, जिल्हा प्रकल्प सल्लगार श्री. चंद्रकांत म्हापणकर सर, काजू युनिट च्या इन्चार्ज श्रीम. राजश्री पारिपत्ये मॅडम, सर्व crp, गावप्रतिनिधी व माहेर cmrc चा सर्व स्टाफ व यशस्वी उत्पादन गटाच्या सर्व सदस्या व बचत गटातील महिला उपस्थित होत्या. उद्घाटनानंतर गटातील महिलांनी अक्षय तृतीयेच्या पवित्र दिवशी बॉयलरला अग्नी प्रदान करून काजू प्रक्रिया उद्योगाची प्रत्यक्ष सुरुवात केली. हा क्षण गटासाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी ठरला. उपस्थित सर्व मान्यवरांनी काजू प्रक्रिया प्रकल्पसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. या गटाने 2015- 16 पासून आजपर्यंत या व्यवसायातून यशस्वी गटाचे नाव यशस्वीरीत्या विकसित केले. “ग्रामीण भागातील या महिलांनी माहेर cmrc च्या सहकार्याने 10 वर्षे उद्योग क्षेत्रात नाव लौकिक तर केलेच पण त्याबरोबर गावाचेही नाव नावलौकिक केले . आर्थिक सक्षमीकरणाचा नवा अध्याय काजू प्रक्रिया उद्योगामुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती, मूल्यवर्धन, आणि बाजारपेठेत थेट सहभाग यांसारखे अनेक फायदे महिलांना मिळत आहेत. या उपक्रमामुळे महिलांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर वाढवून या नवतेजस्विनी यशस्वी काजु उत्पादक गटातील महिलानी खरा सक्षमीकरणाचा आदर्श नमुना सावंतवाडी तालुक्यात सर्वांसमोर ठेवला आहे. हा उद्योग केवळ व्यवसाय नसून ग्रामीण महिलांच्या आत्मविश्वासाचा, जिद्दीचा आणि एकजुटीचा उत्कृष्ट नमुना आहे. या उपक्रमामुळे इतर महिला बचत गटांनाही प्रेरणा मिळून भविष्यात अशा अनेक उद्योगांची निर्मिती होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेऊन व काजू युनिट च्या सर्व महिलांना भेट वस्तू देऊन कार्यक्रमाची सांगता केली.
