आताच शेअर करा

दिनांक: १९/०४/२०२६

सावंतवाडी: सिंधुदुर्गात कलेचे प्रतीक असणारे कोकणातील दशावतार हा फक्त या कलेचे कोकणातील सिंधुदुर्गातच  सादरीकरण होते असे नाही. शेजारील  गोवा राज्यासह अन्य राज्यातही दशावतार कलेचे प्रयोग होत असतात. देशाच्या राजधानीत आपली कला फक्त मराठीतच नव्हे तर हिंदी भाषेतहीदशावतार नाटक सादर करून त्याचेदाखले  व महत्त्व पटवूनदेण्याचे  काम आज दशावतार कलेने केले आहे.दशावतार ही कला सिनेमासृष्टीलाही लाजवणारी अशी असून या कलाकारांची भाषाशैली आणि तेवढ्याच तोलामोलाचे अभिनय सादर करणारी आहे.दशावतार कलाकारहा  फक्त कलाकार नसून सिंधुदुर्गातील एक सर्व साधारण घराण्यातून येणारा एक शेतकरी आहे.परंतु  काही काळापासून या कलाकारावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सिंधुदुर्गात संघर्ष समितीची स्थापना झालेली आहे.

कलाकार-मालक एकत्र; दशावतार क्षेत्रात शिस्तीची नवी सुरुवात, कलाकारांच्या
तोंडी ठरावांना मान्यता, पण पुढे लेखी करार बंधनकारक
एक कलाकार दोन ठिकाणी  ठराव करतो याला आळा; एखाद्या कलाकाराला मालका कडुन होणाऱ्या  अन्यायाला वाचा फोडणे, मध्येच कलाकार कंपनी सोडून जाणे, एखाद्या मालकाने कलाकारांचा मोबदला पुर्ण न करणे, इत्यादी नियमबद्ध व्यवस्थेकडे दशावतार क्षेत्राचा कल
फसवणूक रोखण्यासाठी ‘दशावतार कला संघर्ष समिती’ पुढे सरसावली आहे.

दशावतार कलेत फसवणुकीला लगाम घालण्यासाठी अखेर मोठे पाऊल उचलण्यात आले असून, कलाकार आणि मालकांना एकत्र आणत “दशावतार कला संघर्ष समिती”ची स्थापना करण्यात आली आहे.
आतापर्यंत प्रचलित असलेले शाब्दिक ठराव आणि त्याअंतर्गत झालेले व्यवहार लक्षात घेऊन त्यांना ग्राह्य धरण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. मात्र, यापुढे सर्व करार लेखी स्वरूपातच करणे बंधनकारक राहणार आहे.
तसेच डबल कलाकारांच्या ठरावावर बंदी, करारभंगावर दंडात्मक कारवाई, कलाकारांचे हक्क संरक्षण आणि कलाकारांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येणार असून, वाद निवारणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे दशावतार कलेत शिस्त प्रस्थापित होऊन फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *