
दिनांक: १०/०४/२०२६
तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे
तळवणे:सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च (STS) परीक्षेत तळवणे नं.4 च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून तळवणे सारख्या छोट्या खेडे गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे खरोखरच तळवणे गावासाठी गर्वाची गोष्ट असून पहिल्या टॉप 50 मध्ये आपल्या नावाचे स्थान मिळवत आपले तसेच गावाचे नाव या विद्यार्थ्यांनी रोशन केले आहे.
सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत कु. श्रावणी शिवाजी कवडे हिने 14 वा क्रमांक मिळवला तर कु. गौरांग बाबु वैज याने 39 वा क्रमांक मिळवला आहे. तळवणे नं. 4 मधील शाळेतील सर्व विद्यार्थी हे मेडलचे मानकरी ठरलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या यशामध्ये विद्यार्थ्यांच्या तर कष्टाच मेहनतीच कौतुक करावंच लागेल तेवढेच शिक्षकही या यशाचे भागीदार आहेत. शाळेचे मुख्याध्यापक विनोद झेंडे सर यांच तसेच इतर शिक्षकांचं मोलाचं मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभलं
गाव पातळीवर तालुका पातळीवर तसेच जिल्हा पातळीवर या विद्यार्थ्यांचे गौरव केला जात आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे खरोखरच कौतुकास्पद असून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केलं जात आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या तळवणे गावाला ही चांगलाच नावलौकिक मिळवून दिला आहे.
