दिनांक: १७/०३/२०२६
शिरोडा: शिरोडा ग्रामपंचायत मध्ये वारंवार सांगून देखील. ड्रीम गोवा बिल्डिंग चा त्रास स्थानिक गरीब जनतेला होत आहे. शिरोडा गावात आरोग्याला यांच्या मुळे धोका निर्माण झाला आहे. शिरोडा गावच्या आरोग्य विषयक समस्या असेल तर खपून घेतले जाणार नाही असे प्रथमेश उर्फ बड्या परब. यांनी सांगितले
गेली कित्येक दिवस हा त्रास शिरोडा येथील रहिवाशी सहन करत आहे.याची माहिती शिरोडा ग्रामपंचायत मध्ये सरपंच ग्रामविकास अधिकारी यांना वारंवार सांगून देखील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ड्रीम गोवा यांच्यावर कठोर कारवाई ग्रामपंचायत कडून करण्यात यावी. जर ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असेल तर. शिरोडा गावातील ग्रामस्थ यांना सोबत घेऊन उपोषणाला बसेन. ही वेळ संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने येऊ देऊ नये ह्या विषयावर तात्काळ कारवाई करून संबंधित इमारत बांधकाम विकासकाला माहिती द्यावी व निर्णय करावा.या विषयावर तोडगा न काढल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल याची दखल संबंधितांनी घ्यावी.

