बांदा प्रतिनिधि:संकेत वेंगुर्लेकर
दिनांक: ५ जुलै २०२४
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १८ फेब्रुवारी रोजी पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत
बांदा येथील व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून ह्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ करून शाळेला चांगली सुरूवात करून दिली आहे. यामध्ये इयत्ता पाचवी मध्ये कु.चैतन्य मनोज महाबळ व कु.माधव सुधाकर डेगवेकर तर आठवीतील कु.अनुष्का रामचंद्र तेली व कु.सुयश संदिप गावकर या विद्यार्थ्यांनी स्काॅलरशिप परिक्षेत घवघवीत यश संपादन करून १००% निकाल लागून शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.यामध्ये पाचवीचा इंग्लिश विषय शिक्षिका लविना डिसोझा,गणित शिक्षिका सौ.स्नेहा नाईक, इंटेलिजन्स विषय शिक्षिका सौ.शिल्पा कोरगावकर तर मराठी विषयासाठी शिक्षिका सौ. दिक्षा नाईक यांनी मार्गदर्शन केले.तर इयत्ता आठवीसाठी शिक्षिका सितारा मांद्रेकर तसेच श्री.निरंजन आरोंदेकर , गणितासाठी शिक्षिका रसिका वाटवे, इंटेलिजन्ससाठी मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई तर मराठीसाठी शिक्षिका सौ.कल्पना परब या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन श्री.मंगेश कामत, मॅनेजर श्री. त्रिविक्रम उपाध्ये , सेक्रेटरी श्री.बी.सातारकर ,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.राऊळ, शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक तसेच शाळेचे हितचिंतक यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे व शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
जाहिरात