
दिनांक: २६/०२/२०२६
बांदा: बांदा येथील पी एम श्री केद्रशाळा बांदा नं १ येथे डिजिटल लॅबचे उद्घाटन करण्यात आले.
आज तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक गोष्ट एका क्षणात आपल्याला समजते ती संगणकाच्या मदतीने आणि याच संगणकावर मुलांना शिक्षण दिले जावे यासाठी संगणक लॅब ची पुर्ण रचना ह्या शाळेत केली गेली.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जि.प.सदस्य श्री प्रमोद कामत लाभले.बांदा गावच्या सरपंच श्रीमती प्रियांका नाईक,उपसरपंच श्री.आबा धारगळकर, श्रीमती श्वेता कोरगावकर, श्री.नरसिंह काणेकर,श्री श्याम मांजरेकर, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्रीमती ऋतिका नाईक, पंचायत समिती सदस्य श्रीमती सुश्मिता जाधव, श्री.राजाराम सावळाराम सावंत, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री.हेमंत मोर्ये, संतोष बांदेकर,संपदा सिद्धये,श्रद्धा नार्वेकर,निलेश मोरजकर आदी उपस्थित होते.
मुलांना अध्ययन करताना तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर मुलांचे शिक्षण प्रभावी मनोरंजक व अभ्यासपूर्ण होईल.
मान.प्रमोद कामत यांनी शाळा व शाळेच्या भविष्यातील योजना साठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या.
शाळेचे मुख्याध्यापक मान.श्री.शांताराम असनकर सर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शाळेत येणाऱ्या समस्या आपले मत मांडले.
