आताच शेअर करा

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर 

दिनांक: ३ जुलै २०२४

कोल्हापूर येथील प्रोऍक्टिव्ह अबॅकस लिमिटेड आयोजित प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल समर कॉम्पिटिशन जून २०२४ या स्पर्धेत माणगाव प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या विद्यार्थिनीनी उज्वल यश संपादन केले. सहा मिनिटात १०० गणिते सोडविणे असे या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेचे स्वरूप होते.
         सध्याच्या स्पर्धेच्या युगात कमीत कमी वेळेत गणितीय बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, करत आपली बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी या स्पर्धा पद्धतीचा उपयोग होतो. या स्पर्धा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या एकूणच शैक्षणिक जडणघडणीत मोलाची भर पडत आहे. या स्पर्धेत सुमारे २००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
        या स्पर्धेत प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या माणगाव सेंटर मधील शुभ्रा भिसे, दुर्वा भिसे, मैत्री धुरी, ज्ञानदा पिळणकर यानी उज्वल यश संपादक करीत ट्रॉफी पटकावली. या विद्यार्थ्यांना माणगाव प्रोऍक्टिव्ह अबॅकस संस्थेच्या संस्थापिका सौ मानसी मनोज खोचरे यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे प्रोऍक्टिव्ह अबॅकसचे डायरेक्टर गिरीश करडे, सौ सारिका करडे, अजय मणियार, ज्योती मणियार, तेजस्विनी सावंत यांनी अभिनंदन केले.

                     जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *