बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर
दिनांक:१ जुलै २०२४
बांदा देऊळवाडी येथे आज मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब यांच्या घरावर सागाच्या झाडाची फांदी कोसळली. यावेळी वीज वाहक तारा तुटून पडल्या. यावेळी परब यांचे वडील विष्णू परब हे नजिकच काम करत होते, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली.
ही घटना आज दुपारी घडली. विष्णू परब हे आपल्या घरानजीक काम करत होते. त्यावेळी अचानक सागाच्या झाडाची भालिमोठी फांदी तुटून पडली. त्यावेळी त्यांनी प्रसंगवधान दाखवत लागलीच सुरक्षित स्थळी धाव घेतली यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी वीज वाहक तारा तुटून जमिनीवर कोसळल्या. तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला. यावेळी श्री परब यांच्या घराच्या पत्र्याची शेड व पाणी साठवण टाकीचे नुकसान झाले. झाड बाजूला केल्यानंतर वीज पुरवठा सायंकाळी सुरळीत करण्यात आला.