
दिनांक: ९ ऑक्टोबर २०२५
बांदा प्रतिनिधी:
मडूरा गावात हत्तींच्या हालचाली लक्षात घेता वन विभागाने तात्काळ निरीक्षण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सहाय्यक वनसंरक्षक श्री. वैभव बोराटे साहेब, सावंतवाडी वनक्षेत्रपाल श्री. सुहास पाटील साहेब, तसेच RRT टीम व इतर वन कर्मचारी कार्यरत आहेत.
या अभियानात मदुरा गावातील स्थानिक ग्रामस्थांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. श्री. रूपेश परब, बंटी परब, सिद्धेश परब आणि अनिश परब या ग्रामस्थांनी वन विभागाला हत्ती शोध व नियंत्रण मोहिमेत सक्रियपणे मदत केली. त्यांनी रात्रभर वन कर्मचाऱ्यां सोबत राहून निरीक्षण, माहिती देणे, तसेच इतर प्रवास व्यवस्थापन सहाय्य दिले.
ग्रामस्थांच्या या सहकार्यामुळे वन विभागाला परिसरात हत्तींची अचूक हालचाल समजून घेण्यात मोठी मदत झाली असून, संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करता आल्या.
वन विभागाने या ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले असून, जनतेच्या सहकार्यानेच मानव-प्राणी संघर्ष टाळता येतो, असे प्रतिपादन अधिकारी वर्गाकडून करण्यात आले आहे.