
दिनांक: ५ ऑक्टोबर २०२५
महाराष्ट्रातील नामवंत भजनी बुवा भजनसम्राट प्रमोद हर्यान बुवा यांचा वाढदिवस महालक्ष्मी मुंबई येथील किंग जॉर्ज पंचम स्मारक संचलित, आनंद निकेतन वृदद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत त्यांच्या सोबत केक कापून, अन्नदान करून व त्यांच्या सोबत एकत्रित भजन गायन करून साजरा करण्यात आला. यावेळी हर्यान बुवा शिष्य परिवाराने वृदद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत वेळ घालवून त्यांच्या दु:खावर फुंकर घालून आनंदी वातावरण निर्माण केले.
गेली सहा वर्षे हर्यान बुवा शिष्य परिवार माध्यमातून वाढदिवसाचे औचित्य साधून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
यावेळी बोलताना श्री. प्रमोद हर्यान म्हणाले की, या वृद्धाश्रमातील वृद्धाना रक्ताच्या नात्यांनी दूर ठेवले असले तरी त्यांच्या आठवणीत हे वृध्द आपले जीवन जगत असतात पण अशा वेगळ्या उपक्रमांनी त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होतो व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते. तसेच समाजात सामाजिक जाणीव आणि माणुसकीची भावना वाढते. आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो त्यामुळे वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून वृद्धांची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे, त्यांची सेवा करून त्यांना आपल्या आनंदात सामावुन घेणं व त्यांची मदतरुपी सेवा करुन त्याचं दुःख कमी करणं यात आम्हाला वेगळा आनंद भेटला. वृद्ध व्यक्तींच्या चेहऱ्यावरचा आंनद पाहून मनाला कुठेतरी सार्थक व वृद्धांची सेवा करण्यास मिळाले हे मी माझे भाग्य समजतो असे श्री. हर्यान म्हणाले.
यावेळी प्रियांका हर्यान, संतोष टक्के, संतोष शितकर, रुपेश पाटकर, संतोष भोगले, सतिश कार्लेकर, राकेश मिशाळ, अक्षय कदम, सुंदर टक्के, सदानंद सुर्वे, कृष्णा धुरी, प्रदीप राऊळ, महेंद्र घाडी, सुधीर नारकर, गणेश जांभळे, राजेश धामणे, उदय गणपत पांचाळ, उमेश सावंत, सागर सावंत, गुरु घाडी, प्रमोद राणे, यतीन सावंत, गुरुनाथ भोजने, उदय धुरी, उमेश नारकर, दिनेश नारकर, प्रदिप गुरव, हेमंत सावंत, उदय पांचाळ, आबा सावंत, सायली कुंभार, विजयश्री सागवेकर व अनेक मान्यवर उपस्थित होते.