
दिनांक: २५ सप्टेंबर २०२५
बांदा: प्रतिनिधि
युगेन या कंपनीने बांदा सटमट वाडी येथे गेल्या दोन वर्षांमध्ये अतोनात वृक्ष तोड केली आहे.त्या जागी आपला खाजगी व्यवसाय उभारण्याचा त्यांचा मानस दिसून येत आहे.ही वृक्षतोड करत असताना शासनाची रीतसर परवानगी घेतलेली आढळून येत नाही. प्रमाणापेक्षा जास्त वृक्षतोड केल्याने निसर्गाची ऱ्हास होत आहे. आपल्या स्वार्थापोटी कोकणातील निसर्गरम्य जंगले नष्ट करण्याचा या कंपनीचा डाव असल्याचा निदर्शनास येत आहे. किंबहुना त्या ठिकाणी नवीन वृक्ष लागवड ही करण्यात आलेली नाही. केलेली वृक्षतोड ही कायदेशीर रित्या आहे की नाही ही पडताळणी करण्यासाठी आज दिनांक २५ सप्टेंबर रोजी उ.बा.ठा सेनेचे युवा सेना उपतालुका अध्यक्ष रियाज खान यांनी उप वनविभाग अधिकारी मिलेश शर्मा यांना निवेदन देऊन त्याची जात पडताळणी करण्यात यावी. योग्य ती कार्यवाही करून कंपनीवर दंड ठोठवला जावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.असे न केल्यास येत्या आठ दिवसात वनविभाग कार्यालय सावंतवाडी येथे धरणे आंदोलन करण्याचा इशारा श्री. खान यांनी दिला.यावेळी त्यांच्या सोबत सागर धोत्रे, श्रीकांत धोत्रे निशांत तोरस्कर, साहिल खोबरेकर व संजय बांदेकर उपस्थित होते.