
दिनांक: २१ सप्टेंबर २०२५
सावंतवाडी: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त, प्राथमिक आरोग्य केंद्र, निरवडे येथे टेलीमेडिसिन व आरोग्य तपासणी उपक्रमाचे उद्घाटनमाजी सभापती पंकज पेडणेकर तसेच खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्वरित व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. डॉ. लंबे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी सर्व मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करत डिजिटल आरोग्य सेवांच्या महत्व पूर्ण विषयावर भर दिला. उपस्थित ग्रामस्थांनीही उपक्रमाचे कौतुक करत आरोग्य केंद्रातील सुविधा अधिक सक्षम होण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.