
दिनांक: १६ सप्टेंबर २०२५
बांदा प्रतिनिधी: कास गावच्या नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत गावातील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विठ्ठल जनार्दन पंडित यांची निवड करण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीत ग्रामविकासासाठी तंटामुक्त वातावरणाची गरज अधोरेखित करण्यात आली.
यावेळी सरपंच प्रविण अशोक पंडित,उपसरपंच श्रेया शांताराम राणे,ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशासेविका, शिक्षक,आरोग्य कर्मचारी तसेच नंदकिशोर कासकर,पांडुरंग पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत गावातील नागरिकांमध्ये ऐक्य वाढविणे,तंटे सामोपचाराने सोडविणे आणि शांतता प्रस्थापित करणे या समितीच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवर चर्चा करण्यात आली.नव्या अध्यक्षांकडून गावाच्या विकासासाठी तंटामुक्तीच्या कामात सकारात्मक भूमिका बजावली जाईल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. उपस्थितांनी विठ्ठल पंडित यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.