
दिनांक: ६ ऑगस्ट २०२५
जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र आणि अटल प्रतिष्ठान, सावंतवाडी यांच्या संयुक्त सौजन्याने माध्यमिक विद्यालय, डेगवे येथे नुकताच वह्या वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या प्रसंगी अटल प्रतिष्ठानचे संस्थापक मा. श्री. नकुल पार्सेकर आणि जिजाऊ संस्थेचे मा. श्री. वाल्मीक बिलसोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शाळेतील एकूण 120 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
कोकणातील विद्यार्थी हुशार असून सुद्धा कोकणातील शासकीय अधिकारी मात्र कोकणा बाहेरील असतात. याचे मुख्य कारण कोकणातील विद्यार्थी व पालक याना एमपीएससी यूपीएससी या स्पर्धा परीक्षांविषयी योग्य व सखोल मार्गदर्शन होत नाही यासाठी जिजाऊ संस्थेतर्फे अशा मार्गदर्शन वर्गांचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन श्री बिलमोरे यांनी याप्रसंगी दिले.
कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस. के. सावंत सर आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.