
दिनांक: ४ जुलै २०२५
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर
खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल येथे पुण्यश्लोक श्रीमंत पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक एन जी नाईक यांच्या हस्ते प्रशालेच्या इमारतीत असलेल्या बापूसाहेब महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. महाराजांच्या पुतळ्या शेजारी सुंदर सजावट केली होती. श्रीमंत बापूसाहेब महाराजांच्या नावानेच सुरु असणाऱ्या खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल या प्रशालेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराजांच्या जीवन कार्याची जाणीव व्हावी या साठी गटवार काही स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील विजेत्या स्पर्धकांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले. सावंतवाडी राजघराण्याचा इतिहास आणि पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांचे जीवन, कार्य या बद्द्ल प्राध्यापक अनिकेत सावंत यांनी उपस्थितांना व्याख्यान दिले. या प्रसंगी मुख्याध्यापक श्री एन. जी. नाईक, पर्यवेक्षक पी. एस. सावंत, पी.यू. देसाई, संस्कृतिक विभाग प्रमूख सूर्यकांत सांगेलकर, सुनील परब, जे डी सावंत, मिलन वसकर यांसह समस्त शिक्षक, कर्मचारी वृंद, विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचलन श्री सांगेलकर सर तर रणसिंग सर यांनी आभार प्रदर्शन केले.