
दिनांक: ३० जून २०२५
बांदा प्रतिनिधि: अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, वाशी (मिरज) मार्फत घेण्यात येणाऱ्या एप्रिल – मे सत्रात संगीतातील विविध वाद्य परीक्षेत तबला पखवाज विषयात श्री देव ईस्वटी संगीत विद्यालय, पाडलोस मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले.
प्रारंभिक परीक्षा – लक्ष्मण श्रीकृष्ण गवस, रुद्र सुधाकर बुराण, बाळकृष्ण वामन कदम, रोहन विठ्ठल धुरी, अनुवेदा दिलीप घोगळे.
प्रवेशिका प्रथम – करिष्मा कृष्णा परब, श्रेयस दिनेश पेडणेकर, आत्माराम श्यामसुंदर कासकर, कार्तिक कृष्णा राणे, मुकेश सदानंद गवस, अक्षय एकनाथ खर्डे, संकेत संतोष परब, सुयश देवेंद्र गवस.
प्रवेशिका पूर्ण – निहाल मधुसूदन उक्षेकर, रितेश गुणाजी सावंत, भरत लक्ष्मण सावंत, पियुष वासुदेव गावडे.
मध्यमा प्रथम – राज रमेश कोटकर, शुभम सदाशिव सावंत, ऋतिक राजन सावंत, आबाजी मोहन देसाई या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे संचालक व शिक्षक पखवाज अलंकार अमेय तुकाराम गावडे यांनी अभिनंदन केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागातर्फे दहावी बोर्डसाठी या परीक्षा प्रमाणपत्राचा उपयोग अतिरिक्त कला गुणांसाठी होत असल्याने विद्यार्थ्यांचा फायदा आहे. त्यामुळे पुढील काळात या संधीचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन विद्यालयाचे शिक्षक अमेय गावडे यांनी सांगितले.