
दिनांक: ५ मे २०२५
दोडामार्ग भेडशी प्रतिनिधी: गौरी नाईक
सिंधुदुर्गतील दोडामार्ग तालुक्यात-साटेली भेडशी येथील” थोरले भरड” या ठिकाणी अनाधिकृत मदरशाचे बांधकाम करण्यात आले होते हे बांधकाम अनाधिकृत असल्याचे हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना कळाले त्यानंतर संबंधित ठिकाणी हिंदू संघटनेचे माणसं ग्रामस्थ आणि राजकीय कार्यकर्ते आक्रमक होऊन यांनी ही इमारत अनधिकृत असल्याने तेथे इमारत पाडण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.पण आज या अनधिकृत मदरशावर प्रशासनाने बुलडोझर फिरवला घर बांधणीसाठी घरचा परवाना घेवून मदरसा उभारण्यात आला होता.गेली ४ वर्षापासून अनधिकृत मदरसा चालवण्यात येत होता.७ ते १० वर्षाच्या मुलांना उर्दु आणि अरबी भाषेचे प्रशिक्षण दिले जात होते.त्यासाठी बिहार मधून मुस्लिम धर्मगुरू तिथे प्रशिक्षण देण्यासाठी येत होते.स्थानिकांचा त्याला विरोध होता.कारण स्थानिकांची जाण्यासाठी तिथली वाट ४ वषेॅ बंद करण्यात आली होती. स्थानिकांनी वेळोवेळी प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली होती. पण प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केला आणि कोणती कारवाई केली नाही. ज्यावेळी हिंदू संघटनांनी आणि तेथील नागरिकांनी आक्रमक होऊन ठिय्या आंदोलन केले त्यावेळी प्रशासनाचे डोळे उघडले आणि प्रशासन जागे होऊन त्या ठिकाणी पोचले.
परंतु ज्यावेळी कारवाई झाली त्यावेळी तेथे मदरसामधे शस्त्रसाठा सापडला होता. त्यामधे २ तलवारी सापडले होते. पालक मंत्री नितेश राणे यांनी अशा प्रकारे तलवारी सापडत असतील तर कारवाई करा असे आदेश दिले होते आज सोमवारी दोडामार्ग पोलिस निरिक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या नेतृत्वात मोठा पोलिस फौजफाटा घेवून कडक बंदोबस्तात सकाळपासून २ जेसिबी मशिन १ बुलडोझर घेवून मदरसा पाडण्यात आली.