आताच शेअर करा
मडूरा तिठा येथील श्री हनुमान मंदिरात मूर्ती तत्वोत्तरण विधी संपन्न झाले.

दिनांक: १७ एप्रिल २०२५

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर

रोणापाल – मडूरा तिठा येथील श्री हनुमान मंदिरात पुरोहितांच्या मंत्रोच्चारात मूर्ती तत्वोत्तरण विधी भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. पुरोहित विजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सोहळा पार पडला.

रोणापाल – मडूरा तिठा येथील श्री हनुमान मंदिर शिखर कलशारोहण व मूर्ती पुनःप्रतिष्ठापना सोहळा शुक्रवार २५ एप्रिल रोजी साजरा होत आहे. त्या अनुषंगाने बुधवारी मूर्ती तत्वोत्तरण विधी संपन्न झालेत. यावेळी होमहवन व अन्य धार्मिक विधी पार पडले.

यावेळी श्री हनुमान देवस्थान समिती सदस्य व परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाविकांना तीर्थप्रसाद वितरीत करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *