
ओटवणे प्रतिनिधि
दिनांक: १२ मार्च २०२५
काल सरमळे पुलानजीक मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी आलेल्या माजगाव तांबळगोठण येथील निखिल सूर्यवंशी वय ४८ हा तरुणाचा नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. माजगाव येथील काही युवक पार्टी च्या उद्देशाने सरमळे नदीवर आले होते पाण्यात उतरलेल्या निखिल याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला ही बाब सहकाऱ्यांनी स्थानिकांच्या कानावर घातली.सरमळे पोलीस पाटील दिपक कांबळे घटनास्थळी दाखल होत बांदा पोलिसांना खबर दिली उशीरा बांदा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल कुडतरकर घटनास्थळी दाखल झाले व स्थानिक युवकांच्या मदतीने मृत देह बाहेर बाहेर काढला. कोंड खोल असल्याने युवकांना ठाव लागत नव्हता मात्र विलवडे येथील युवक अर्जुन गोपाळ दळवी या युवकाने राकेश नार्वेकर, सचिन राऊळ यांच्या साथीने मृतदेह पाण्या बाहेर काढला मृत देह शव विच्छेदनादनासाठी बांदा आरोग्य केंद्रात नेण्यात आला. निखिल हा माजगाव येथील अनेक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर होता तो अनेक वर्ष माजगाव नाला नवरात्रोत्सव मंडळाचा अध्यक्षही होता. पार्टी साठी आलेल्या युवकाचा प्रथम दर्शी मृत्यू हा बुडून झाला असला तरी नेमकी घटना काय घडली याचा तपास बांदा पोलीस करत आहेत.