
दिनांक: ७ मार्च २०२५
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर
सिंधुदुर्ग फळबागायतदार संघ आणि कृषी अधिकारी यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक आज बांदा येथे ११:०० वाजता झाली. त्यात कोकणातील आंबा,काजू आणि विमा संदर्भात ही बैठक होती. सिंधुदुर्गातील आंबा, काजू विमा संरक्षण पॉलीसी मध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. पॉलीसी आहे त्यात फक्त मशिन काम करते.परंतु मशीन सोडून अन्य बाबी आहेत याचा विचार केला गेला पाहिजे.मशीन तापमान आणि पर्जन्यमान वगैरे तत्सम बाबींचा डेटा देते.यामुळे उत्पादन घटते की काय किंव्हा अन्य काही कारणे आहेत. हे शोधणे गरजेचे आहे. सर्व उपचार करूनही उत्पादन आवश्यक तेवढे येते की नाही.यावर संबधीत खात्याने तपासून पाहणे गरजेच आहे.,शेतकरी खरोखरच फायद्यात आहे की तोट्यात याची प्रत्यक्ष पाहणी करून कृषी विभागाने शासन दरबारी अहवाल सादर करावा. आणि तो अहवाल विमा पॉलिसी नियमात जमा धरून विमा जाहीर करण्यात यावा.काही ठिकाणी तापमान,पर्जन्यमान मापक यंत्रे बंद असतात,काही ठिकाणी ही यंत्रे आहेत त्या भागात तापमान आणि पर्जन्यमान हे आढळत नाही. प्रत्यक्ष मात्र नजिकच्या गावात ही यंत्रे जवळ आहेत त्या ठिकाणी तापमान, पर्जन्यमान असतो परंतु फक्त ते गाव दुसऱ्या महसूल मंडळ मध्ये सामाविष्ट केलेले असल्यामुळे विमा मंजूर होत नाही.अशा अनेक बाबी सुधारित करणेत गरजेचे आहे. या सर्व गोष्टींवर आज चर्चा करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्याने याबाबत सविस्तर चर्चा करून विधिमंडळा पर्यंत कृषी विभागाच्या मार्फत अहवाल पाठवावा. शेतकऱ्यांची शेती न करण्याची मानसिकता होत चालली आहे ती थांबवून शेतकरी शेतीकडे आकर्षित होऊन जास्तीत जास्त जमीन लागवडी खाली आणावी हया साठी प्रयत्न चालु झाले पाहिजे. भारत देश कागदावर किंवा पुस्तकात शेतीप्रधान आहे. असे कुठे तरी दिसत आहे. मध्यंतरी त्यात बदल होत होता तो कायम राहील पाहिजे. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. यासाठी शासनाने प्रयत्न करावा असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांना या बैठकीत करण्यात आले. सिंधुदुर्ग फळ बागायतदार संघाच्या माध्यमातून कृषी विभागाने या फळ बागायतींची प्रत्यक्ष पाहणी करून उत्पादनाबाबत अहवाल शासनाकडे पाठवावा. अशी मागणी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून डिंगणे नेतर्डे,डोंगरपाल,मडुरा,रोणापाल ह्या भागात भागात त्यांची सर्व टीम पाहणी करून शासनाला अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे त्यांच्या मार्फत सांगण्यात आले.
त्यावेळी श्री विलास सावंत, अध्यक्ष – सिंधुदुर्ग फळबागायतदार प्रोडूसर कंपनी,नितीन मावळणकर,संचालक कंपनी,शेतकरी संघाचे कार्यवाह तथा रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे आणि वर कृषी अधिकारी आणि कर्मचारी अनिकेत कदम, उपविभागीय कृषी अधिकारी, सावंतवाडी. एस. ए. सरगुरु, कृषी पर्यवेक्षक. सौ. मनाली परब, कृषी पर्यवेक्षक. सौ सौ.पल्लवी सावंत, कृषी सहाय्यक. सौ. रसिका वसकर, कृषी सहाय्यक उपस्थित होते.