आताच शेअर करा
फोटो  दाणोली –  पुस्तक प्रकाशन प्रसंगी उपस्थित सुधांशु लोकेगांवकर नरेंद्र नांदुरकर श्रद्धा आडारकर हेमांगी सांडू मेधा साटम.

दिनांक: ६ मार्च २०२५

शिर्डीच्या साईबाबांना समकालीन असलेले कोकणातील संतांचे संत शिरोमणी दाणोली नगरीचे श्री सद्गुरू समर्थ साटम महाराज यांच्या मराठी चरित्राच्या हिंदीत अनुवाद केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी सकाळी दाणोली येथील साटम महाराज समाधी मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
        लेखक र. ग. वायंगणकर यांनी साटम महाराज यांचे चरित्र पुस्तक रूपात लिहिले आहे. समस्त साटम महाराज भक्त परिवारामध्ये ते लोकप्रिय ठरले आहे. साटम महाराजांच्या या चरित्राच्या मराठी आवृत्तीचे शिर्डी येथील सुधांशु लोकेगांवकर यांनी हिंदीमध्ये भाषांतर केले आहे. पुणे येथील नरेंद्र नांदुरकर यांनी अनमोल प्रकाशनतर्फे या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी साटम महाराजांच्या समाधीवर अर्पण करून करण्यात आले.
      यावेळी आनंद अनावकर, लेखक सुधांशु लोकेगांवकर, प्रकाशक अनमोल नांदुरकर, नरेंद्र नांदुरकर, आसावरी चित्रो, सोनाली नांदुरकर, आर्टिस्ट श्रद्धा आडारकर, सांडू ब्रदर्स आयुर्वेदिक कंपनीचे मालक हेमांगी सांडू, मेधा साटम, विनोद नार्वेकर, पुणे, शिर्डी, मुंबईसह कोकणातील भक्त मंडळी उपस्थित होती. हे चरित्र दाणोली समाधी मंदिरात तसेच पुण्यात अनमोल प्रकाशन या ठिकाणी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 9922953632 या मोबाईल नंबर वर तसेच 020-24468569 या दूरध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *