
तळवणे प्रतिनिधि: शंकर गावडे
दिनांक: १ फेब्रुवारी २०२५
आज शनिवार दि. ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी आरोंदा श्री सिद्धिविनायक राष्ट्रोळी मंदिर जोशीवाडी येथे माघी गणेश जयंती कार्यक्रम होत आहे. श्री देव सिद्धिविनायक कला क्रीडा मंडळ, जोशीवाडा आरोंदा यांच्यावतीने माघी गणेश जयंतीचा भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम साजरा केला जातो. या कार्यक्रमास दशक्रोशीतील अनेक भाविक आवर्जून गणरायाचे दर्शन घेण्यास उपस्थित असतात.
माघी गणेश जयंती निमित्त सकाळी सकाळी गणेश मूर्तिचे आगमन झाल्यानंतर श्रींची पूजा, अभिषेक, महाआरती व तीर्थप्रसाद तसेच स्थानिक ग्रामस्थ्यांचे व श्री राष्ट्रोळी प्रभू पंचायतन महिला भजन मंडळ, वाघाली कामूर्ली यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. उद्या रविवार दि ०२ फेब्रुवारी २०२५ रोजी श्रींच्या मूर्तिचे विसर्जन केले जाईल व या कार्यक्रमांची समाप्ती होईल.