न्हावेली / प्रतिनिधि
दिनांक:२७/१०/२०२४
बाजूने आलेल्या ट्रकला बाजू देण्याच्या प्रयत्नात जेसीबी महामार्गावरून डाव्या बाजूला खोल असलेल्या ‘खाईत’ कोसळला. मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगांव भाईनभाटले पूला लगत हा प्रकार घडला. सुदैवाने या अपघातात जेसीबी चालकासह त्याच्यासोबत असलेले तिन्ही साथीदार बालबाल बचावले.
झाराप पत्रादेवी बायपास वरून महामार्गाचे काम करणारा जेसीबी चालक काम आटोपून बांदा येथून झाडाच्या दिशेने निघाला होता. मळगांव भाईन भाटले येथे आला असताना पाठीमागून वेगात येणाऱ्या ट्रकला बाजू देण्याच्या प्रयत्नात जेसीबी चालकाचा ताबा सुटला व तो पुलालगत असलेल्या खोल खाईत कोसळला. चालक व त्याच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे ते चौघेही सुखरूपपणे बचावले.