न्हावेली / प्रतिनिधि
दिनांक: २८ सप्टेंबर २०२४
न्हावेलीत गव्या रेड्यांनी हैदोस घातला असून आज सकाळी भातशेतीत उतरून हाती आलेल्या पिकाची नासधूस केलेली आहे.भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
न्हावेलीतील शेतकरी चिंताग्रस्त परिस्थितीत असून शेतकरी आनंद न्हावी यांच्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान गव्या रेड्यानी केले आहे. शेतीत उतरून गव्यरेड्या भातशेतीचे नुकसान करण्यात आले.ही बाब उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या कानावर पडताच लगेच घटनास्थळी युवा उपसरपंच उपस्थित राहून घटनास्थळाची पाहणी केली.
लगेच वन विभागाला याची माहिती देऊन झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यास फोन वरुन चर्चा करून भाग पाडले. वन अधिकाऱ्यांना घटना स्थळी घेऊन स्वतः शेतीची पाहणी केली. लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवून दया असा वनविभाग अधिकाऱ्यांसमोर धारणा धरला. त्यामुळे उपसरपंच यांना लवकर नुकसाभरपाई देऊ असे आश्वसन वन अधिकाऱ्यांनी दिले.