आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर

दिनांक: १ सप्टेंबर २०२४

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व शिवस्मारक पुन्हा नव्याने सन्मानपूर्वक उभारण्यात यावा तसेच यातील जे अपराधी असतील त्यांना पोलीस प्रशासन , जिल्हा प्रशासन तसेच राज्य सरकार यांनी कारवाई करावी या मागणीसाठी  निवेदन देण्यात आले.
      सिंधुदुर्ग येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हा आपल्या दैवताचा व महाराष्ट्राचा अपमान झाला असून हा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याची तमाम शिवप्रेमींची संतप्त भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये तीव्र संताप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच महाराजांचा पुतळा पुन्हा नव्याने सन्मानपूर्वक उभारण्यात यावा अशी मागणी यावेळी बांदा मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले.
     यावेळी बांदा मराठा समाज अध्यक्ष विराज परब , सचिव आनंद वसकर, सहसचिव हेमंत मोर्यें, महिला अध्यक्षा स्वाती सावंत, सचिव माधवी गाड, बांदा मुख्य समन्वयक लक्ष्मी सावंत. माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, मेहश मोर्यें-सावंत, राखी कळंगुटकर, लव रेडकर, राकेश परब, स्वप्नील सावंत, अरुणा सावंत, हेमंत दाभोलकर, लता रेडकर तसेच अनेक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *