
दिनांक:२९/११/२०२६
सातर्डा : सातर्डा गावातील काराखांडी वाडी परिसरात तेरेखोल नदीचे खारे पाणी शेतात जाऊ नये म्हणून खारा बंधारा येथे बंधारा घातला जातो दरवर्षा प्रमाणे या ही वर्षी बंधारा घालण्यात आला होता हा बंधारा घातल्यामुळे लोकांना व्यवस्थीत पाण्याचा पुरवठा होत असतो त्यामुळे विहिरीची पातळी स्थिर राहते म्हणून तो बंधारा घातला जातो पण आज एका अज्ञात व्यक्तीने या बंधार्यातील पाण्यात विषारी केमिकल्स युक्त द्रावण मिसळल्याने पाण्यातील मासे मृत पावल्याचे निदर्शनास आले त्या पाण्यात असंख्य मासे मृत अवस्थेत तरंगताना दिसून आले या पाण्याचा वापर शेती करण्यासाठी होतो तसेच त्या परिसरातील विहिरींची पातळी वाढण्यासाठी होतो त्यामुळे हे विषारी पाणी शेतात गेल्यास शेतीचा पोज बिघडू शकतो. पाळीव प्राण्याने हे पाणी प्राशन केल्यास जीवित हानी होण्याची शक्यता आहे तसेच हा बंधारा खास करून पाण्याची पातळी वाढवण्यासाठी केला जातो त्यामुळे विहिरींना याचा मोठा फायदा होतो तेथील परिसरातील विहिरींची पाणी पातळी समतोल राहते या उद्देशाने हा बंधारा घातला जातो परंतु या अज्ञात व्यक्तीने केलेले कृत्य अतिशय निंदनीय असून त्या कृत्याची दखल म्हणून जिल्हा परिषद सदस्य सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी घेतली. घटनास्थळी जाऊन पाहणी केली पाहणी केल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आले की हे कुठेतरी केमिकल मिक्स केल्याचा प्रकार प्रथम दर्शनी दिसून आला त्यामुळे त्यांनी हे पाणी टेस्टिंगसाठी संकलित करून संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे असे श्री कवठणकर यांनी सांगितले प्रशासनाचा टेस्टिंग रिपोर्ट येई पर्यंत परिसरातील या पाण्याचा वापर करू नये अशी विनंती परिसरातील नागरिकांना करण्यात आले.
विशेष म्हणजे, या नदीच्या पाण्याचा वापर परिसरातील चार वाड्यांमधील ग्रामस्थांकडून दैनंदिन कामांसाठी केला जातो. कपडे धुणे, गुरांना पाणी पाजणे तसेच इतर गरजांसाठी या पाण्यावर अवलंबून असलेल्या ग्रामस्थांमध्ये या घटनेमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर यांनी घटनास्थळी उपस्थित राहून नदी परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत सातर्डा येथील पत्रकार संदीप कवठणकर तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
या पाहणीदरम्यान नदीच्या प्रदूषणाची परिस्थिती आणि त्याचे संभाव्य परिणाम यांची माहिती घेण्यात आली. संबंधित घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील स्तरावर पाठपुरावा करून पाणी प्रदूषित होण्यामागील कारण शोधणे आणि योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
चार वाड्यांच्या पाणीवापराचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाने या गंभीर घटनेची तातडीने दखल घेऊन नदीच्या पाण्याची तपासणी करावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
