आताच शेअर करा

दिनांक:२४/११/२०२६


तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे

गुळदुवे:गुळदुवे गावची ग्रामदेवता असलेल्या श्री देवी सातेरी – श्री देव विरेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा होणार आहे. या जत्रोत्सवानिमित्त देवस्थानच्या वतीने दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

    जत्रोत्सवाची सुरुवात सकाळी सर्व देवतांवर महाअभिषेक, सम्राधना, ओटी भरणे, केळी मानवणे, नारळ ठेवणे, नवस बोलणे व फेडणे अशा धार्मिक विधींनी होणार आहे. रात्री ११.३० वाजता दीप उजळणी करण्यात येणार असून, रात्री १२ वाजता श्रींच्या सर्व मंदिरांकडे सवाद्य पालखी प्रदक्षिणा व फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. त्यानंतर रात्री २ वाजता आरोलकर
दशावतार नाट्य मंडळ, आरवली (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग) यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

    या जत्रोत्सवासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री देवी सातेरी व श्री देव विरेश्वर यांचे दर्शन घ्यावे आणि धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी-विरेश्वर देवस्थान, गुळदुवे व समस्त गुळदुवे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *