आताच शेअर करा

दिनांक: १२/०९/२०२६

सावंतवाडी: कोकण  व्हिजन न्यूज चॅनेल च्या आरती संग्रहाचे उद्घाटन सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब माझी आमदार शंकर कांबळी, युवा सेना तालुका अध्यक्ष क्लेटस फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले .

कोकण व्हिजन न्युज गेले कित्तेक वर्ष खास गणेश चतुर्थी उत्सवा निमित्त आरती संग्रहाचे प्रकाशन करत असते. हे चॅनल सातत्य पूर्व सोशल मीडियावर काम करत असून वेळोवेळी शोध सत्याचा घेत असते. समाजातील सर्व विषय  मिडिया च्या माध्यमातून आज  पर्यंत मांडत आले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात या चॅनेलला चांगली प्रसिद्धी मिळाली आहे.


न्यूज चॅनेल चे संपादक यश माधव यांनी कोकण व्हिजन न्यूज चॅनलच्या जाहिरातदारांचे आभार मानले आहे. तसेच ज्यांनी ज्यांनी या आरती संग्रह काढण्यास सहकार्य केले त्यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *