
दिनांक: २५/०४/२०२६
बांदा: शालेय परीक्षा संपल्या नंतर कोकण आणि गोवा येथे पर्यटकांची रीघ कोकणच्या दिशेने वाढलेली दिसून येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच गोवा राज्यात सध्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात येजा सुरू असून कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ यांची वाहतूक होऊ नये याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय मोहन दहीकर अप्पर पोलीस अधीक्षक माननीय नयोमी साटम उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सिंधुदुर्ग, तसेच बांदा पोलिसांच्या उपस्थितीत येणाऱ्या जाणारे खाजगी बसेस तसेच इतर वाहनांची श्वानपथक कडून इन्सुली पोलीस चेक पोस्ट येथे विशेष तपासणी करण्यात आली व अमली पदार्थाची वाहतूक होणार नाही याकरिता दक्षता घेण्यात आली.
