आताच शेअर करा

दिनांक: १८/०४/२०२६

सावंतवाडी: सावंतवाडी पंचायत समितीची मासिक सभेत  २४ मार्च २०२६ रोजी पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ते यांनी मांडलेल्या सावंतवाडी गटाकडल जिल्हा परिषद शाळा मधील पदवीधर शिक्षकांची पदे भरण्याबाबत व महाराष्ट्र गोवा सीमेवरील शाळांची पटसंख्या वाडी बाबत आढावा सभा आयोजित करून कार्यवाही करण्यात यावी अशी सूचना करण्यात आली होती. या सर्व बाबीवर विचार विनिमय करून योग्य तो तोडगा काढण्यासाठी आपल्या केंद्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापक ,अध्यक्ष, सचिव, शाळा व्यवस्थापन समिती तसेच संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच यांची सभा दिनांक २१ एप्रिल२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता केंद्र शाळेत आयोजित करण्यात आलेली आहे. शिक्षकांना भेडसावणारे प्रश्न, शाळांमधील पदवीधर शिक्षकांची पदे भरण्याबाबत व महाराष्ट्र गोवा सीमेवरील शाळांचे पटसंख्या वाढीबाबत अशा अनेक विषयावर या सभेमध्ये चर्चा होणार आहे . या सभेत योग्य तो मार्ग काढण्यासाठी पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ते यांनी ही  बैठक आयोजित केली आहे.या सभेमध्ये सामाजिक कार्यकर्ते नितीन कळंगुटकर हे ही उपस्थित राहून आपले शिक्षण व घटती पटसंख्या या विषयावर आपले मत मांडणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed