
दिनांक: १६/०४/२०२६
बांदा: वाफोली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली पंचायतन मंदिराचा भव्य ‘पंचकुंडी पुनः प्रतिष्ठापना सोहळा’ २१ ते २४ एप्रिल या कालावधीत भक्तिमय वातावरणात होणार आहे.या चारदिवसीय सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक विधी,होमहवन आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
यात २१ एप्रिलला सकाळी ७ वाजता यजमानांची शरीरशुद्धी व प्रायश्चित्त विधी,८ ते दुपारी १ या वेळेत गाऱ्हाणे, प्रधानसंकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदिश्राद्ध, संभारदान, वर्धिनीपूजन, प्राकारशुद्धी, ‘गणेशयाग’, पंचकुंडी मंडप प्रतिष्ठा आणि श्री देवी माऊली पंचायतन परिवारातील देवांचा जलाधिवास, कौतुकबंधन, आरती व तीर्थप्रसाद.२२ ला सकाळी ७.३० ते दुपारी १ पर्यंत मंगलाचरण,प्राकारशुद्धी,सर्व मूर्तीना स्थान विधी,ब्रह्मादी मंडल देवता पूजन,मूर्तीचा शय्याधिवास, योगिनी,वास्तू, भैरव,क्षेत्रपाल मंडल देवता पूजन,अरणी मंथापूजन,अग्नी उत्पत्ती,अग्नी स्थापना,ग्रह मंडल देवता पूजन,अन्वाधान, वास्तू,ग्रहयजन, लघुपूर्णाहुती आणि तीर्थप्रसाद. २३ ला सकाळी ७.३० पासून मंगलाचरण, प्राकारशुद्धी, आवाहित देवता पूजन, अग्निपूजन, पर्यायहोम,मुख्य देवतासाठी हवन आणि लघुपूर्णाहुती तीर्थप्रसाद.२४ ला सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० या वेळेत मंगलाचरण, प्राकारशुद्धी, आवाहित देवता पूजन,तत्वहोम, आवाहित मंडल देवतांसाठी हवन १०.२६ ते ११.११ या शुभमुहूर्तावर श्री देवी माऊली पंचायतन देवता पुनःप्रतिष्ठापना,तत्त्व न्यास, प्राणप्रतिष्ठा आदी कार्यक्रम होतील.
