
दिनांक: १३/०४/२०२६
वेरणा (गोवा) : ऑल इंडिया एस.सी./एस.टी. एम्प्लॉईज असोसिएशन, केआरसीएल – वेरणा यांच्या वतीने 14 एप्रिल 2026 रोजी ‘संयुक्त जयंती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन संयुक्त जयंती समितीच्या माध्यमातून करण्यात आले असून, समाजातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.
मंगळवार, दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 9.30 ते 10.00 या वेळेत पूजाविधीने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शुभम सिन्हा (DEE – कावर – केआरसीएल) उपस्थित राहणार आहेत.
तसेच, या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र शासनाचे राज्य युवा पुरस्कार विजेते प्रेरणादायी वक्ते प्रा. रुपेश पाटील (मुख्य संपादक, सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज चॅनेल) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. विशेष अतिथी म्हणून एनायत हुसेन (सिनियर DOM-कावर-केआरसीएल) यांची उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमादरम्यान कोकण रेल्वेचे अधिकारी व इतर मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार असून, पाहुण्यांचे मार्गदर्शनपर भाषण, पारितोषिक वितरण व आभार प्रदर्शन यांचा समावेश आहे. यानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
हा कार्यक्रम वेरणा – गोवा येथील कम्युनिटी हॉलमध्ये आयोजित करण्यात आला असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत जाधव तर सचिव दीपक जाधव हे असून, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.
