
दिनांक: १७/०३/२०२६
शिरोडा: रेडी येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास स्मृती प्रित्यर्थ आयोजित रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन श्री जयवंत मुळीक व चेतन सावंत यांनी करुन सर्व सदस्यांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सदर शिबिराची सुरुवात करण्यात आली.
दुर्गरक्षक प्रतिष्ठान, माऊली युवा प्रतिष्ठान रेडी,लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि.(मल्टि स्टेट),मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट, मुंबई, SSPM मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल,पडवे रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर रेडी ग्रामपंचायत सभागृह येथे
सोमवार,दिनांक १६ मार्च २०२६,सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते. नेत्र तपासणी शिबिरात
केवळ ₹.१८०/- मध्ये सुबक व सुंदर दर्जाचे चष्मे वितरण करण्यात आले.
सदर रक्तदान शिबिरास ३० रक्तदात्यांनी रक्तदान करुन छत्रपती श्री संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचा २४० नागरिकांनी लाभ घेतला.
सदर दोन्ही शिबीर यशस्वी होण्यासाठी नाना राऊळ,सचिन कोंडये,उतेज परब,सुनील मुळीक,जयवंत मुळीक,गौरी जुवेकर,डॉ.केतन सोनी, दुर्गरक्षक प्रतिष्ठान, माऊली युवा प्रतिष्ठान रेडी,लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लि.(मल्टि स्टेट),मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट, मुंबई यांचे सर्व सक्रिय कार्यकर्ते व रेडी पंचक्रोशी ग्रामस्थांचे विशेष योगदान लाभले.
