आताच शेअर करा

दिनांक: ०२/०३/२०२६

बांदा: बांदा मराठा समाजाच्या वतीने नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ. ऋतिका नाईक तसेच उपसरपंच रत्नाकर आगलावे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. स्थानिक पातळीवर मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
    यावेळी मराठा समाजातील पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला. समाजाच्या विकासासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याची अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
   सत्काराला उत्तर देताना सौ. ऋतिका नाईक व रत्नाकर आगलावे यांनी समाजाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले व लोकहिताच्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.
    या कार्यक्रमास मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब, सहसचिव हेमंत मोर्ये, माजी अध्यक्ष बाळु सावंत, नीलेश मोरजकर, सल्लागार आनंद गवस, दीपक सावंत, गुरुनाथ सावंत, नीलेश सावंत, राकेश परब, राजा सावंत, महेश मोर्ये, मनोज सावंत, विकी कदम, महिला मराठा अध्यक्ष स्वाती सावंत, माधवी गाड, अवंती पंडित, अर्चना सावंत, राखी कळंगुटकर, लक्ष्मी सावंत आदिसह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश परब यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *