तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे
दिनांक: २९ मार्च २०२५
साटेली येथे कोकण सम्राट ग्रुप आणि साटेली ग्रामस्थ प्रस्तुत गुढीपाडवा महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तीन दिवसांचा हा कार्यक्रम असून दि. 29 मार्च म्हणजे आजपासून या कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे.
आज रात्री शनिवार दि. 29 मार्च रोजी मोरेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ मोरे यांचा ” वैष्णवी महिमा ” हा महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. दुसऱ्या दिवशी रविवार दि. 30 मार्च रोजी गुंडू सावंतवाडी व संदीप लोके यांचा जंगी डबलबारी सामना होणार आहे. सोमवार दि. 31 मार्च रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे.
या कार्यक्रमांस दशक्रोशीतील सर्व नाट्यरासिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन साटेली येथील स्थानिक ग्रामस्थानकडून करण्यात आले आहे.
