आताच शेअर करा

सिंधुदुर्ग संपादकीय

दिनांक : १४  डिसेंबर २०२४

वडिलोपार्जित शेकडो एकर जागा कवडीमोल भावाने विकून दापोली तालुक्यातील शेतकरी अल्पभूधारक होताना दिसत आहे. एका सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.  दापोलीतील नव्या पिढीसाठी ही बाब चिंतेची बनत आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील ५० टक्क्यांहून अधिक जागांचे मालक हे परराज्यातील किंवा अन्य जिल्ह्यांतील आहेत. तालुक्यात असणाऱ्या मोक्याच्या जागा या आधीच बळकावल्या गेल्या आहेत. त्यामुळे दापोलीत स्थानिकांचे अस्तित्व जवळपास संपुष्टात येताना दिसत आहे.

     तालुक्यात १०५ ग्रामपंचायती आणि १७३ गावे आहेत. या १७३ गावांमध्ये अन्य राज्यातील लोकांनी जमिनी खरेदी केल्याचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे अनेक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात घरे, रो हाऊसेस, बंगलो, बांधकामाच्या नोंदी दर महिन्याला होताना दिसत आहेत. शेकडो एकर जागा खरेदी केलेले परप्रांतीय मालकांना गाव पातळीवर विरोध होऊ नये म्हणून मंदिर, सार्वजनिक इमारती, सार्वजनिक सुविधा अशा ठिकाणी ते देणगी देत असून स्थानिक पुढाऱ्यांचे ‘खिसेही गरम’ केले जात असल्याची चर्चा सुरु आहे.

तालुक्यातील अनेक जागांचे व्यवहार हे बनवाबनवी करून झाले असल्याचीही ओरड होताना दिसत आहे. स्थानिकांकडून खरेदी केलेल्या जागेवर विकसकांनी रो-हाऊसेस, बंगलो बांधून शेकडो लोकांना त्याची विक्री केली आहे. यातील अनेक ठिकाणी विकासकांना विक्री केलेल्या जागेत जागा मालक मजूर म्हणून राबताना दिसत आहेत. तालुक्यातील पूर्वजांनी शेकडो एकर जागा आपल्या पुढील पिढीसाठी जतन करून ठेवल्या होत्या. अगदीच गरज भासली तर जागा गहाण ठेवली जात होती आणि अशा जमिनी सोडवून ती परत मिळवली जात होती. मात्र आता त्याच वडिलोपार्जित जागा विकून स्थानिक लोक मुंबईसारख्या ठिकाणी खोली विकत घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. गावातील जागा विकल्याने तालुक्यातील अनेकांचे कायम वास्तव्य हे मुंबईत होताना दिसत आहे. गावाला केवळ सणासुदीला तो येताना दिसत आहे. शासनाकडून मिळणाऱ्या धान्यामुळे तालुक्यातील शेतीही ओसाड पडण्याच्या मार्गावर आहे. अशा प्रकारे शेती ओसाड ठेऊन करायची काय म्हणून ती विकली जात असून भावी पिढीसाठी चिंतेचे बाब ठरली आहे

हीच परिस्थिती जवळजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात होताना दिसत आहे त्यामुळे सतर्कतेच्या इशारा समजून सिंधुदुर्गवासीयांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनी परप्रांतीयांच्या घशात न घालता त्या वाचवण्याचा प्रयत्न करावा. नअपेक्षा दापोली रत्नागिरी या भागातील परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यावर ओढायला  उशीर लागणार नाही.

*दारु विकुन लोकांचे संसार उद्धवस्त करून जर अनेक लोक करोडपती होत असतील तर, आपण अशा व्यसनी लोकांचे उध्दवस्त होणारे संसार वाचवून व डायबिटीस च्या असह्य वेदनापासून लोकांची मुक्ती करून, समाजसेवा करून जर आपणास मान सन्मान,प्रतिष्ठा व पैसे मिळवता येत असतील तर काय हरकत आहे ….?  आधुनिक समाजसेवेचा मार्ग धरा. अशी ही समाज कार्य करण्याची दुर्मिळ संधी आपली वाट पाहत आहे.*

*मग उशीर कशाला, आत्ताच फोन करा फक्त घरी बसून काम सुरू करा. शिक्षणाची अट नाही, गुंतवणूकीची गरज नाही. सविस्तर माहितीसाठी फोन करा…*

*अधिक माहितीसाठी संपर्क – 📲9819957223/8369539769

*प्रशिक्षण बॅच – 29 डिसेंबर 2024*

*.. समर्थ सोशल फाउंडेशन व जनरल हॉस्पिटल कोल्हापूर.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *